विमान अपघात:एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले, विमानात होते 180 प्रवासी

केरळच्या कोझिकोड विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दुबईवरुन आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले आहे. विमानात 180 प्रवासी होते.

एअर इंडियाचे विमान आयएक्स-1344 दुबईवरुन केरळला येत होते. या विमानात 174 प्रवाशांसह 6 क्रू मेंबर्स होते. या अपघातात दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भयंकर होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. अपघातात जवळपास 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. पावसामुळे विमान स्लिप झाल्याचे सांगितले जात आहे.

Read Full Article Here

Continue Reading

पोलिसांनीच सोशल मीडियावर शेअर केले सुशांतसिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने अनेक खुलासे केले आहेत.

मुंबई- एक दिवसआधी सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह इस्पपितळात नेणाऱ्या अॅम्ब्यूलन्सच्या ड्रायव्हरने दावा केला होता की त्याला आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमक्यांचे फोन येत आहे. चालक शहनवाज अब्दुल करीम आपल्या सहकाऱ्यांसोबत सुशांतच्या घरी गेला होता आणि त्याचा मृतदेह घेऊव कूपर इस्पितळात गेला होता. आता शहनवाजने अजून एक धक्कादायक विधान केलं आहे. हा दावा टाइम्स नाउने हिडन कॅमेऱ्याने घेतलेल्या मुलाखतीत समोर आला.

शहनवाजने या व्हिडिओमध्ये म्हटलं की, जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत नव्हता तर त्याला खाली उतरवण्यात आलं होतं. तसंच त्याच्यावर पांढरा कपडा घातला होता. यासोबतच मुंबई पोलिसांमधील काहींनी सुशांतचे फोटो घेऊन ते फेसबुकवर अपलोड केले होते. तसेच सुरुवातीला पोलिसांनी सुशांतचा मृतदेह नानावटी इस्पितळात नेण्यास सांगितले होते. मात्र काही वेळाने त्यांनी सांगितलं की मृतदेह कूपर इस्पितळात न्यायचा आहे.

Read Full Article Here

Continue Reading

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ‘इतक्या’ वेळा होणार करोना टेस्ट

IPL 2020ची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचदरम्यान करोनाचा धोका लक्षात घेता मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने युएईला जाण्याआधी खेळाडूंची पाच वेळा करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचा वाढता प्रभाव ध्यानात घेत मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापन समितीने काही विशेष गोष्टी ठरवल्या आहेत. त्याबद्दल संघ व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्याने आयएएनएस वृत्तसंस्थेला माहिती देताना म्हटले, “भारतीय खेळाडू आता हळूहळू मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. या सर्व खेळाडूंना १४ दिवस होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे. खेळाडूला करोना चाचणी केल्यानंतरच रूम किंवा हॉटेलच्याबाहेर पडू दिलं जाणार आहे. रूममध्येदेखील चाचणीला लागणारे साहित्य पुरवण्यात येणार आहे.”

Read Full Article Here

Continue Reading